आम्ही दिवाळी शास्त्रानुसार साजरी करू ! – ‘गुरुकुलम् ग्लोबल स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मथुरा (उत्तरप्रदेश) – ‘गुरुकुलम् ग्लोबल स्कूल’मधील विद्यार्थ्यांना शास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी आणि देवीदेवता, तसेच राष्ट्रवीर यांचे फटाक्यांच्या माध्यमातून होणारे विडंबन कसे टाळावे, यांविषयी सनातन संस्थेच्या वतीने कु. पूनम चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘आम्ही शास्त्रानुसार दिवाळी साजरी करू आणि देवीदेवतांचा अवमान करणार नाही’, अशी शपथही विद्यार्थ्यांनी याप्रसंगी घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा सिंह म्हणाल्या, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सणाविषयी पुष्कळ चांगली माहिती सांगण्यात आली आणि भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करू.’
याप्रसंगी श्रीमती सिंह यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी सनातन संस्थेच्या विविध ग्रंथांची मागणी केली.
देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातून वीरश्रीयुक्त जयघोषात दुर्गामाता दौडीस प्रारंभ
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रणजित सावरकर आणि अभय वर्तक यांच्या भेटी !
फरीदाबाद (हरियाणा) येथे जन्माष्टमी निमित्त सनातन संस्था आयोजित ग्रंथ-प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था