वैद्यांनी हवा, पाणी, अन्न यांचे प्रदूषण टाळण्यासाठी समाजाचे प्रबोधन करावे ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

मार्गदर्शनाला उपस्थित जिज्ञासू

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – दिवसेंदिवस पृथ्वीवर विविध प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे मानवाला विविध प्रकारचे कष्टसाध्य असाध्य व्याधी निर्माण होत आहेत, तरी वैद्यांनी समाजाचे आरोग्यरक्षक म्हणून हवा, पाणी आणि अन्न यांचे प्रदूषण टाळण्यासाठी समाजाचे प्रबोधन करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. ‘शाहूवाडी-मलकापूर वैद्यकीय संघटन’कडून गेल्या २५ वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे ‘धन्वंतरी जयंती’ सोहळा साजरा केला जातो. त्या प्रसंगी ते बोलत होते.

संघटनेचे अध्यक्ष वैद्य महेश सुतार यांनी धन्वंतरी जयंतीनिमित्त सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वैद्य मनोहर पाटील, वैद्य भरत पाटील, वैद्य प्रसाद कुलकर्णी, वैद्य अभिजित यादव, वैद्य तन्वी गांधी, वैद्या प्रा. (सौ.) अस्मिता सुतार, वैद्य अभिजित यादव, ‘विकृती विज्ञान तंत्रज्ञ’ श्री. सचिन पाटील, औषधी आस्थापनाचे श्री. वसंतराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, श्री. आनंद भिंगार्डे, मंदिराचे पुजारी श्री. गणेश गांधी आदी उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री. ओजस आनंद भिंगार्डे आणि विठ्ठल मंदिराचे विश्वस्त यांचे सहकार्य लाभले.