पितांबरी आस्थापनात ‘साधनेतून नेतृत्व विकास’ सत्राचे आयोजन !

व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांच्याकडून मार्गदर्शन

 आस्थापनातील सहकार्‍यांना मार्गदर्शन करतांना डॉ. रविंद्र प्रभुदेसाई

ठाणे – पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. मध्ये आस्थापनाच्या सहकार्‍यांसाठी ‘साधनेतून नेतृत्वविकास – भाग १’ विषयावरील तिसर्‍या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार आध्यात्मिक साधना ही ‘व्यक्तीमत्त्व विकास’ आणि ‘नेतृत्व विकास’ वाढवण्यासाठी कशी लाभदायक ठरू शकते, याविषयी ‘पीपीटी’च्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकूण २२५ सहकार्‍यांसाठी या मार्गदर्शन सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी ३० ते ३५ सहकार्‍यांचा एक गट बनवण्यात आला असून आतापर्यंत तीन गटांची सत्रे पूर्ण झाली आहेत. एकूण ५ गटांमध्ये ही सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये कार्यालयातील शिपाई आणि चालक यांचाही समावेश आहे.

‘आजपासूनच गुरुकृपायोगानुसार आध्यात्मिक साधनेला प्रारंभ करा आणि स्वतःची ऐहिक अन् आध्यात्मिक प्रगती करून घ्या’, असे आवाहन त्यांनी या वेळच्या सत्रामध्ये उपस्थित असलेल्यांना केले.

शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रभुदेसाई यांनी उपस्थित सहकार्‍यांशी संवाद साधला, तसेच सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनालाही अनेकांनी भेट दिली.