सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रवचने आणि संपूर्ण वन्दे मातरमचे आयोजन

नौपाडा येथील महाराष्ट्र विद्यालयात प्रवचन घेण्यात आले. ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शाळेतील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून अन्य वर्गांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता आला. मुख्याध्यापक श्री. बी.बी. ठाणेकर यांनी सर्वतोपरी साहाय्य केले.

कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

सनातन धर्मात वेद-उपनिषदांसह अनेकानेक ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान खूप विस्ताराने सांगितले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे घटक, विभिन्न देवता तसेच ईश्‍वर म्हणजे काय ? देवतांना कसे प्रसन्न करून घ्यायचे आणि त्यामुळे काय मिळते ?

दैनिक सनातन प्रभातची सेवा करणा-या साधकांना प्रत्यक्ष कृतीतून घडवणारे आदर्श संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टर कोणतेही लिखाण वाचतांना त्यांच्या समवेत पेन असे. त्यायोगे ते मजकुरावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, व्याकरण किंवा संकलन आदी स्तरांवरील सुधारणा, कोणता मजकूर कशासाठी संरक्षित करायचा यासंबंधीच्या खुणा, अशा विविध खुणा करायचे.

अहर्निश सेवारत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात श्री. रमेश शिंदे यांनी अनुभवलेले त्यांचे प्रेम, शिकवण आणि द्रष्टेपण !

शस्त्रक्रियेनंतर निवासस्थानी आल्यावर लघवी साठवणारी पिशवी दोन पायांच्या मधेमधेेे येऊ नये म्हणून कमरेला बांधून सेवा करणे

उल्हासनगर येथे मुंबई आणि ठाणे येथील धर्माभिमान्यांची कार्यशाळा उत्साहात ; सनातन संस्थेचा सहभाग !

उत्तम हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकिया राबवून ईश्‍वरचरणी कृतज्ञतापूर्वक शरण जाऊन व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा निर्धार सर्वांनी केला. या वेळी सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे २ दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ आणि १० ऑगस्ट या दिवशी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात धर्मप्रेमींसाठी दोन दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.

चेन्नई येथील आदिपराशक्ती मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

तमिळनाडूच्या चेन्नईमधील अरुंबक्कम् येथील आदिपराशक्ती मंदिरात वरलक्ष्मी व्रताच्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनच्या साधिका श्रीमती कृष्णवेणी आणि श्रीमती गीता लक्ष्मी यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभाग घेतला.

अमरावती येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला.