रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली. यात २० हून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या.

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.

रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून आणि श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.