सिंहस्थ क्षेत्री सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्या साधूसंतांनी काढलेले गौरवोद्गार !
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.