पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

1
श्री. उमेश नायक, बेळगाव, कर्नाटक यांना प्रसारसाहित्याविषयी माहिती देतांना सनातनच्या कु. युवराज्ञी शिंदे
2
श्री. संभाजी भोकरे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर आणि श्री. अनिल (राजू) यादव, शिवसेना, करवीर तालुकाप्रमुख, कोल्हापूर यांना प्रसारसाहित्याविषयी माहिती देतांना सनातनच्या सौ. मंगला मराठे
3
डावीकडून अर्जुन यादव, हिंदुत्वनिष्ठ, बोईनी, भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगण; अधिवक्ता गंगाधर भुमा, भाग्यनगर, तेलंगण; वाम्सी कृष्णा रेड्डी, हिंदुत्वनिष्ठ, रंगारेड्डी, तेलंगण; रमेश गुप्ता, व्यावसायिक, भाग्यनगर, तेलंगण आणि टी.एन्. मुरारी, हिंदुत्वनिष्ठ, भाग्यनगर, तेलंगण यांना नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनच्या सौ. सौम्या कुदरवळ्ळी

आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१. आश्रमात प्रत्येक ठिकाणी मला प.पू. गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती आली ! : सनातन आश्रमातील व्यवस्थापन पाहून असे वाटले की, साक्षात् ईश्‍वरच सर्व साधकांच्या माध्यमातून कार्य करत आहे. येथील प्रत्येक ठिकाणी मला प.पू. गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती आली.
– अधिवक्ता मनीषकुमार मोहनलाल वर्मा, भुसावळ (१८.६.२०१६)

२. सनातनचा हा आश्रम म्हणजे पृथ्वीवरील श्रीविष्णूचा वैकुंठधाम आहे, असे वाटले. – श्री. प्रेमप्रकाश कुमार, सुंदरगड, ओडिशा. (१८.६.२०१६)

३. सनातन आश्रम हा आध्यात्मिक शक्ती आणि आनंद यांची अनुभूती करून देतो आणि आपल्याला प्राचीन भारताची आठवण करून देतो. – श्री. रेवण्णा बसप्पा पुडलकट्टी, कार्यकर्ता, हिंदु महासभा, विजयपूर, कर्नाटक. (१९.६.२०१६)

४. आश्रम पाहून धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मशिक्षण आणि संघटन आवश्यक आहे, हे शिकायला मिळाले ! : आश्रम पाहून सनातनच्या साधकांनी वैज्ञानिक दृष्टीने जे मार्गदर्शन केले आहे, त्यातून असे लक्षात येते की, मानवी जीवनात साधना आणि गुरुकृपा हे अत्यावश्यक आहेत. यामुळे धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मशिक्षण आणि संघटन आवश्यक आहे, हे शिकायला मिळाले. – श्री. सुशील चंद्रभान तिवारी, अध्यक्ष, स्वराज्य हिंदू सेना, ठाणे, महाराष्ट्र. (१८.६.२०१६)