पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. या वेळी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.ashram

१. आश्रमात येताच आश्रमातील चैतन्य आणि सात्त्विकता यांची अनुभूती आली. कोणतेही तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठ येथे गेल्यास जसा अनुभव होतो, तसा मला आश्रमात अनुभव आला.

२. आश्रमातील वातावरण पाहून मनाला पुष्कळ शांती लाभली. आश्रमातील व्यवस्था आणि स्वच्छता पुष्कळ सुंदर आहे.

महंत ईच्छागिरी गुरु श्री महंत हरिगिरीजी महाराज (श्री पंचदशनाम जुना अखाडा, हरिद्वार, सोनवारगिरी मठ, तुळजापूर.) (२०.६.२०१६)

३. सनातनचा आश्रम म्हणजे एक अद्वितीय अनुभव ! : आश्रमामध्ये असलेली कामाची पद्धत, सुसूत्रता, नियोजन आणि कुठलेही काम करणारे उच्चशिक्षित साधक हा सगळाच एक अद्वितीय अनुभव आहे. हे पाहून पुढील काळात हिंदुत्वाचे काम करण्यास स्फूर्ती मिळाली आहे.

– श्री. बापू शंकरराव ढगे, उपाध्यक्ष, भावसार समाज, सोलापूर, महाराष्ट्र. (२०.६.२०१६)

आश्रमदर्शन केलेल्या जिज्ञासूंचे अभिप्राय

१. आश्रमातील साधकांमध्ये नम्रता आणि सुसंस्कार दिसतात ! : घरी एरव्ही काही प्रसंगांमध्ये माझी चिडचिड होते; परंतु इथे आल्यापासून दोन दिवस मन शांत आहे. आश्रमातील साधकांमध्ये नम्रता आणि सुसंस्कार दिसतात.

– श्री. अक्षय सुरेश खोले, पुणे (२०.६.२०१६)

२. श्रीकृष्णाचे लहानपणापासूनचे ते विश्‍वरूपापर्यंतचे दर्शन साधकांमध्ये जाणवणे : आश्रमामधील व्यवस्थापन सुंदर असून साधक पूर्णपणे आश्रमाशी एकरूप झालेले आहेत. श्रीकृष्णाचे लहानपणापासूनचे ते विश्‍वरूपापर्यंतचे दर्शन मला आश्रमातील साधकांमध्ये जाणवले. माझे मन आणि शरीर चैतन्याने भारावून गेले.

३. आश्रमातील साधक हिंदु राष्ट्र चालवू शकतील ! : आश्रमात हिंदु राष्ट्र निर्माण करणारे (साधक, सैनिक, सेनापती, राजा) सर्वजण सामावलेले जाणवले. हे सर्व साधक हिंदु राष्ट्र चालवू शकतील.

– श्री. अरुण सीताराम महाजन, बाराहाळी, नांदेड. (२०.६.२०१६)

४. श्रीगुरुवायूर मंदिराच्या अनेक पटींनी चैतन्य सनातन संस्थेच्या आश्रमात अनुभवता आले ! : श्रीगुरुवायूर मंदिर हे केरळमधील श्रीकृष्णाचे प्रमुख मंदिर आहे. मी अनेक वेळा तिथे गेलो आहे. तिथे जे चैतन्य अनुभवता येते, त्याच्या अनेक पटींनी चैतन्य सनातन संस्थेच्या आश्रमात अनुभवता आले.

– श्री. राजू पी.टी., थ्रिसूर, केरळ. (१८.६.२०१६)

५. आश्रमात स्वयंपाकघरात लहान वयाच्या साधिकांना सेवा करतांना पाहून पुढच्या अधिवेशनाला माझ्या मुलीला स्वयंपाकघरात सेवेसाठी पाठवणार !

– श्री. राजू पी.टी., थ्रिसूर, केरळ. (१८.६.२०१६)

२. सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

सूक्ष्म-जगताविषयीचे अनुभव हे अत्यंत विलक्षण आहेत. प्रत्येक व्यक्तीला असेे अनुभव येत असूनसुद्धा ती विश्‍वास ठेवत नाही; परंतु इथे आल्यावर त्याची प्रचीती येते.

– श्री. बापू शंकरराव ढगे, उपाध्यक्ष, भावसार समाज, सोलापूर, महाराष्ट्र. (२०.६.२०१६)

सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून चांगल्या आणि वाईट शक्ती यांमध्ये सतत युद्ध चालू असते, असे वाटले.

– श्री. प्रेमप्रकाश कुमार, सुंदरगढ, ओडिशा. (१८.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात