विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात.

साधकांना आपलेसे करून त्यांच्यासमोर परिपूर्ण सेवेचा आदर्श ठेवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !

‘पू. काकांसमवेत सेवा करतांना त्यांच्यातील भावामुळे बर्‍याचदा आपलीही भावावस्था टिकून रहाते. पू. काकांनी सांगितलेल्या प्रार्थनेमुळे भावजागृती होते. पू. काका प्रार्थना करतांना प्रत्यक्ष प.पू. गुुरुमाऊली समोर असल्याची अनुभूती येते.

सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी काढलेले गौरवोद्गार !

सद्गुरु (सौ.) अंजली यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे. त्यांना महर्षि दैवी प्रवास करायला सांगतात. सनातन धर्म राज्यासाठी त्यांच्याद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळवून घेतात. त्यांच्यामुळे सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद मिळतात आणि आपले कार्य आणखीन सुलभ होते.

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नवीन नोटेतील घटक सात्त्विक नसल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘२ सहस्र रुपये मूल्याची नवीन नोट सात्त्विक नाही. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही, एवढेच नव्हे, तर त्रास होईल’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

‘प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात ; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते.

गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !

‘गायींचे महत्त्व लोकांपर्यंत पोेचवणे आणि गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते गो-कथा सांगण्यासाठी विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृतपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला.

भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात.

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा धक्का !

इंडोनेशियाच्या पूर्व किनार्‍याला ५ डिसेंबरला सकाळी रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला; मात्र यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आलेली नाही. तसेच यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचे तेजस्वी विचारधन !

पू. सीताराम गोयल , एक महान हिंदु तत्त्ववेत्ते, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते. १९४० च्या दशकापर्यंत पू. गोयल हे साम्यवादी विचारसरणीचे होते; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व अनुभवल्यावर ते हिंदु राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक ठरले.