श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूरचा महिमा
पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला नीरा आणि भीमा या नद्यांच्या संगमतटावर श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर वसलेले आहे. ज्यांचे कुलदैवत नृसिंह आहे, त्यांनी या तीर्थक्षेत्री जाऊन श्री नृसिंहाचे दर्शन घ्यावे. पद्मपुराणात म्हटले आहे, हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिचे इंद्रदेवाने हरण केले. त्या वेळी कयाधू गर्भवती होती.