धर्मसाम्राज्याचे संस्थापक जगद्गुरु आद्यशंकराचार्य

जगद्गुरु आद्यशंकराचार्य

शंकराचार्यांचे तेजस्वी धर्मकार्य : वैदिक धर्माचा प्रसार करणे

ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्यात शंकराचार्यांनी मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश) शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना पिठाधिपती म्हणून नेमले.

अधर्मी कापालिकांचा पराभव करणे

श्रीशैल पर्वतावर कापालिक शैवांनी आपला आखाडा सिद्ध केला होता. तेे शिवाला मद्यमांसाचे उपहार समर्पित करत आणि स्वतःही सेवन करत. ते देवाला पशूबळी आणि प्रसंगी नरबळीही देत होते. शंकराचार्यांनी तेथील लोकांना सात्त्विक उपासना करण्याची शिकवण देण्यास प्रारंभ केला. याविषयी राग येऊन उग्रभैरव नावाचा एक कापालिक शंकराचार्यांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन त्यांच्याकडे धावत गेला; पण ऐन वेळी पद्मपाद हा शंकराचार्यांचा शिष्य तेथे आला आणि त्याने उग्रभैरवाच्याच त्रिशुळाने त्याला कंठस्नान घातले. त्यानंतर कापालिकांनी आपला पराभव मान्य केला.

(भारतीय संस्कृतीकोश, खंड ९)

– कु. मधुरा भोसले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment