कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे ! – श्री प्रभु नारायण करपात्री

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.

अखिल भारतवर्षाच्या कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व

कुंभमेळा हा अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची दूरदर्शन वृत्तवाहिनी आणि दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’कडून दखल !

येथील सनातन संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास दूरदर्शनसह विविध वृत्तवाहिन्या, ‘एन्बीटी’ (नवभारत टाइम्स), ‘जनसत्ता ऑनलाइन पोर्टल’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ या प्रथितयश वर्तमानपत्रांनी दखल घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

सनातनच्या सर्व साधकांकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटते. त्याचे कारण म्हणजे ते संतसेवेत असून संतसंगतीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत आहे, असे प्रतिपादन श्री रघुवीर महात्यागी खालसाचे श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

सनातनचे हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले ! – लक्ष्मण बेहरे, संघचालक, गोवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

जोधपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

जोधपूरच्या पोलो मैदानावर नुकतेच आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातनचे ग्रंथ आणि फ्लेक्स यांचे प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या धर्मप्रेमीने टप्प्याटप्प्याने १०० महिलांना प्रदर्शन दाखवण्याचा केला निर्धार !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाला गुजरातमधील धर्मप्रेमी श्री. खेंगाडभाई डोडीया यांनी १६ जानेवारी या दिवशी भेट दिली.

सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे ! – महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज

महामंडलेश्‍वर श्री रामेश्‍वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर साधू-संत आणि सनातन संस्था यांचे उत्स्फूर्त अभियान

येथील शाही स्नान मार्ग, तसेच संगमाच्या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशाप्रकारे श्रीरामाच्या नामजपाचे अभियान १५ जानेवारीला राबविण्यात आले.

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून अध्यात्मप्रसार

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला.