‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी चांगले आहे.’ – महंत शंकरानंदजी महाराज

महंत शंकरानंदजी महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी चांगले आहे. या प्रदर्शनातील ज्ञानातून लोकांचे विचार परिवर्तन निश्‍चित होणार आहे. यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील बहारपुरा मधील सनातन सेवा आश्रमाचे महंत शंकरानंदजी महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी त्यांच्यासमवेत महंत चंद्रानंद महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment