सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनामुळे लोक धर्माचरण करू लागतील ! – स्वामी प्रेम परमानंद महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

(उजवीकडे) स्वामी प्रेम परमानंद महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना सनातनचे साधक श्री. नीळकंठ नाईक

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनच्या प्रदर्शनातून देण्यात येत असलेली सनातन धर्माची माहिती सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. यातूनच लोक धर्माचरण करण्यास प्रवृत्त होतील. संस्थेच्या या कार्याला आपण नेहमीच सहकार्य करू, असे प्रतिपादन उज्जैन येथील कल्याण आश्रमचे स्वामी प्रेम परमानंद महाराज यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. स्वामी प्रेम परमानंद महाराज यांचा सनातनचे साधक श्री. नीळकंठ नाईक यांनी पुष्पहार घालून सन्मान केला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment