सनातनने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो ! – शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वचन

‘सनातन संस्थेने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो. सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षणाचे कार्य होवो’, असे आशीर्वचन जगद्गुरु शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर दिले.

सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

येथील पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या अनेक साधूंनीही ‘सनातन की जय’, ‘सनातन धर्म की जय’, असा जयघोष केला.

जबलपूर येथे आयोजित ‘मकर संक्रमण व्याख्यानमाले’त सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन

सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते.

ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !

अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.

विजयपूर येथील भारतीय संस्कृती उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र

खरे पहाता ऋषिमुनींच्या काळापासून चालत आलेली हिंदूंची वेशभूषा ‘धोतर’ ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे.

डिचोली,गोवा येथील माजी आमदार नरेश सावळ यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

डिचोली येथील माजी आमदार श्री.नरेश सावळ यांनी ११ जानेवारी या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी !

राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली.