संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

साधूंपेक्षाही सनातन श्रेष्ठ कार्य करत आहे ! – पू. फरशीवालेबाबा

पू. फरशीवालेबाबा यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यावर सनातनच्या कार्याचे कौतुक केले.

सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत ! – स्वामी श्री धर्मदास महाराज

सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत.

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व आजही कायम ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व अजूनही कायम असून ते कायम राहील, असे आशीर्वचन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

प्रयाग कुंभपर्वाच्या निमित्ताने ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचा व्यापक धर्मप्रसार !

कुंभक्षेत्र २५ कि.मी. विस्तीर्ण आहे. त्याच्या हृदयस्थानी म्हणजे संगमक्षेत्राजवळील मोरी मार्गाजवळ ‘सनातन संस्थे’ला जागा मिळणे, ही केवळ गुरुकृपा होती.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

ढोलांचे गजर (वालंग), नामघोष, गजी नृत्य, तलवार नाचवणे (बनगर नृत्य) यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सायंकाळी पू. भगवान डोणे महाराज यांचा भाकणुकीचा विशेष कार्यक्रम होता.

गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था

समस्त सनातनधर्मी हिंदु समाज कुंभपर्वात गंगास्नान करणे, याला पुण्यकारी मानतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गंगानदीत डुबकी घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करतात.

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे.

कुंभमेळ्यातील सनातनच्या ‘धर्मशिक्षण’ आणि ‘राष्ट्र-धर्म रक्षण’ यांसंबंधीच्या फलक प्रदर्शनास जिज्ञासू, साधू, संत-महंत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे ! – श्री प्रभु नारायण करपात्री

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.