पंच दशनाम महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

गुजरात येथील पंच दशनाम महानिर्वाणी आखाडा आणि खोइसम गुजरात संप्रदायाचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा अवधेशाश्रम यांनी २८ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते हेमंत ध्यानी यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी २८ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी ‘राष्ट्र आणि धर्म’ याविषयी चर्चा केली.

प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ यात्रा आणि भाकणूक यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैज्ञानिक संशोधन !

‘बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली. दिसायला ही गावे दोन असली, तरी त्या दोन्ही गावांना श्री हालसिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे.

श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचा भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. डोणे महाराज यांचे आश्रमात आगमन होतांना प्रवेशद्वाराशी सुवासिनींनी त्यांच्या चरणांवर जल घातले. देवाच्या अश्‍वाचीही पूजा करण्यात आली.

सनातनचे कार्य चांगले आहे ! – श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास बापू

सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट असून सनातनचे कार्य चांगले आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्यातील राजकोट येथील अखिल भारतीय वैष्णव विरक्त संत महामंडळाचे श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास महाराज यांनी २७ जानेवारीला येथे केले.

सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील ! – सुनील ठाकूर, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज (जिल्हा रत्नागिरी)

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर आणि कार्यकर्ते श्री. राजन बोडेकर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास नुकतीच भेट दिली.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल.

प्रयागराज : सनातन संस्थेने आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ‘अक्षयवट आणि बडे हनुमान’ या मार्गावर सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष’ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.