सनातन संस्था ही सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन चालवत आहे ! – श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्‍वराचार्य, अमरावती, महाराष्ट्र

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु
जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनांना विविध संत-महंत यांनी भेट दिल्यावर काढलेले गौरवोद्गार !

१. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्‍वराचार्य यांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची माहिती देतांना २. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) – कुंभमेळ्यातील सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून चांगले वाटले. या प्रदर्शनात सनातनी ग्रंथांचे एकत्रीकरण करून लोकांना संघटित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सनातन धर्म काय आहे, त्याच्या पद्धती, प्रेरणा आणि दिशा कोणती आहे, हे तुम्ही या ग्रंथप्रदर्शनातून सांगत आहात. येथे आल्यानंतर मला अनुभूती आली की, सनातन संस्था सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन करून ते चालवत आहे. या पद्धतीला मी शुभेच्छा देतो, असे मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्‍वराचार्य (माऊली सरकार) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना त्यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना ‘देवनदी गंगाकी रक्षा करे !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ भेट दिला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या वेळी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्‍वराचार्य यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी चर्चा केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment