सनातनच्या प्रदर्शनतून भाविकांमध्ये जागृती होत आहे – हरिद्वार येथील (भूपतवाला) घन:श्याम भवनचे किसनदास महात्यागी

किसनदास महात्यागी (बसलेले) यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – हिंदु संस्कृतीवर घाला घातला जात असून या विषयी नागरिकांना जागृत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जनजागृतीचे तुम्ही करत असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील (भूपतवाला) घन:श्याम भवनचे किसनदास महात्यागी यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर हेही उपस्थित होते.

किसनदास महात्यागी पुढे म्हणाले की, येथे लावण्यात आलेले प्रदर्शन चांगले आहे. यातून भाविकांमध्ये जागृती होत आहे. देशात मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याद्वारे षड्यंत्रे रचली जात आहेत. ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात आहे. यासंदर्भात अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment