परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’त काष्ठ (लाकडी) चरणपादुका धारण केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि त्यांनी धारण केलेल्या चरणपादुकांवर, तसेच चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर पादुकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुकांचे महत्त्व

‘चेन्नई, तमिळनाडू येथील भृगु जीवनाडी वाचक श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षींनी पुढीलप्रमाणे सांगितले – ‘गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांच्या काष्ठ (लाकडी) चरणपादुका बनवून घ्याव्यात. सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्यावर जेवढे फळ मिळते, तेवढे फळ सनातनच्या साधकांना त्यांच्या गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणपादुकांचे शरणागत भावाने दर्शन घेतल्यावर मिळेल.’ त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या काष्ठ चरणपादुका बनवण्यात आल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी या पादुका १०.२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी धारण केल्या होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी काष्ठ चरणपादुका धारण केल्यावर त्यांच्या स्वतःवर, तसेच त्यांनी धारण केलेल्या पादुकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत १०.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’त पादुका धारण करण्यापूर्वी आणि पादुका धारण केल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या, तसेच त्या पादुकांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

१२.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. हे पूजन झाल्यानंतर त्या पादुकांच्या पुन्हा एकदा उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – इथून पुढे लेखात काष्ठ चरणपादुकांना ‘पादुका’, असे संबोधले आहे.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी धारण केलेल्या पादुका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. ‘पादुका धारण सोहळ्या’नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी धारण केलेल्या पादुका यांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होणे

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर त्या पादुकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ८९.५१ मीटर वाढ होणे

१२.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन केले. पूजनानंतर पादुकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ८९.५१ मीटर वाढ झाली. याचा अर्थ षोडशोपचार पूजनानंतर पादुकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ इ १. ‘पादुका धारण सोहळ्या’नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी धारण केलेल्या पादुका यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होणे

२ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर त्या पादुकांच्या एकूण प्रभावळीत १००.८४ मीटर वाढ होणे

१२.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन केले. पूजनानंतर पादुकांच्या एकूण प्रभावळीत १००.८४ मीटर वाढ झाली. याचा अर्थ षोडशोपचार पूजनानंतर पादुकांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. ‘पादुका धारण सोहळ्या’नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ होण्यामागील कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील (उच्च आध्यात्मिक स्तरावरील) संत असल्याने त्यांच्यात मुळातच पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. ‘पादुका धारण सोहळ्या’त परात्पर गुरु डॉक्टरांनी पादुका धारण कराव्यात’ अशी महर्षींची आज्ञा होती. या सोहळ्यासाठी महर्षींचा संकल्प कार्यरत होता. पादुका धारण सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी ईश्‍वरेच्छा म्हणून महर्षींनी सांगितलेल्या गोष्टींचे भावपूर्णरीत्या आज्ञापालन केले. सोहळ्याच्या वेळी ईश्‍वराकडून परात्पर गुरु डॉक्टरांकडे पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. त्यामुळे त्यांच्यातील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे ‘पादुका धारण सोहळ्या’नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी सिद्ध केलेल्या पादुकांमध्ये
‘पादुका धारण सोहळ्या’पूर्वीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असण्यामागील कारण

सनातनच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून पादुका भावपूर्णरीत्या बनवल्या आहेत. तसेच या पादुका पुढे सहस्रो वर्षे चैतन्याचा स्रोत बनणार असल्याने त्यांच्यामागे ईश्‍वरी संकल्पही कार्यरत आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी सिद्ध केलेल्या चरणपादुकांमध्ये ‘पादुका धारण सोहळ्या’पूर्वीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांनी
‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी धारण केलेल्या पादुकांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा देह, त्यांच्या सभोवतालचे वातावरण, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती इत्यादींवर होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी धारण केलेल्या पादुकांना त्यांच्या चैतन्यमय चरणांचा स्पर्श झाला होता.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]

Leave a Comment