कुंभक्षेत्री झारखंड येथील पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ५८ वर्षे) झाल्या सनातनच्या ८४ व्या संत !

पती आणि पत्नी दोन्ही संत असल्याची सनातनच्या इतिहासातील आणखी एक घटना !

प्रयागराज – कुंभक्षेत्री, कुंभपर्वामध्ये, एकादशीच्या विशेष स्नानाच्या मुहुर्तावर, रामनाथी आश्रमात गुरुपादुका सप्ताह चालू असतांना कुंभ रास असलेल्या झारखंड येथील साधिका सौ. सुनीता खेमका संतपदी विराजमान झाल्या. एका भावसोहळ्यात सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी सनातनच्या ८४ व्या संत म्हणून त्यांची घोषणा केली. ही घोषणा होताच सर्व साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले, जणू या भावाश्रूंनीच सनातनच्या साधकांचे कुंभस्नान झाले. या वेळी कतरास, झारखंड येथील साधिका सौ. संजुषा सिंह यांचीही ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. या सोहळ्याला वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, तसेच झारखंड येथील सनातन संस्थेचे धर्मप्रसारक आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांचे पती पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती.

 

कुंभक्षेत्री भावाश्रूंनी झाले सनातनच्या साधकांचे कुंभस्नान !

पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा सन्मान करतांना पू. प्रदीप खेमका

प्रयागराज – कुंभक्षेत्री १६ फेब्रुवारीला झालेल्या एका भावसोहळ्यात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी झारखंड येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता प्रदीप खेमका या सनातनच्या ८४ व्या संत झाल्याची घोषणा केली. या आनंदवार्तेमुळे कुंभक्षेत्रातील साधकांनी भावाश्रूंनी कुंभस्नान केल्याचा आनंद अनुभवला. या वेळी पू. प्रदीप खेमका यांच्या शुभहस्ते पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-उत्तर भारत प्रसारसेवक पू. नीलेश सिंंगबाळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका आणि पू. नीलेश सिंंगबाळ

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘पू. (सौ.) सुनीतादीदी यांच्या जीवनात पू. प्रदीप खेमका हे गुरुरूपानेच होते, हे पू. सुनीतादीदी यांनी त्यांचे जे आज्ञापालन केले, त्यातून सिद्ध झाले आहेे. त्यांच्या या गुणामुळेच त्यांची प्रगती जलद झाली. पू. सुनीतादीदी यांनी पू. प्रदीप खेमका यांचे इतके आज्ञापालन केले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे किती केले असेल ! आज त्यांना प्राप्त झालेल्या संतपदाच्या निमित्ताने परात्पर गुरूंनी सर्वांना कुंभक्षेत्राचा सर्वांत मोठा प्रसाद दिला आहे. तोही संत पती-पत्नीच्या रूपाने !’’

या वेळी पू. नीलेश सिंंगबाळ म्हणाले, ‘‘कतरासमधील पू. प्रदीपदादा आणि पू. सुनीतादीदी यांचे घर म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विद्यालय’च आहे’, अशी आम्हाला अनुभूती येते. त्यांच्या दोघांच्याही बोलण्यात गुरुदेवांविना दुसरेे काहीच नसते. कतरास येथे गेल्यावर पू. सुनीतादीदी साधकांची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे तेथून प्रवासाला निघतांना काही विचार करावा लागत नाही. त्यांचा नातू कु. श्रीहरि याच्यावरही ते साधनेचे संस्कारच करत आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंब गुरुदेवमय आणि सनातनमय झाले आहे.’’

 

संतपद प्राप्त झाल्याने सौ. सुनीता आता पूर्णांगिनी झाली ! – पू. प्रदीप खेमका

पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या संतपदाची घोषणा झाल्यावर मनोगत व्यक्त करतांना पू. प्रदीप खेमका म्हणाले, ‘‘सौ. सुनीता माझी अर्धांगिनी होती, आता पूर्णांगिनी झाली आहे. सौ. सुनीता यांनी मला साधनेत सांभाळले आहे. घराचे आणि मुलांचे दायित्व तिने पाहिले. साधनेपूर्वी मी षडरिपूमध्ये डुंबलो होतो. माझ्या जवळच्या नातेवाइकांशीही माझे संबंध चांगले नव्हते. सौ. सुनीताने मात्र सर्वांशी चांगले संबंध ठेवले. आमच्यात मतभेद जरूर होतात; पण मनभेद कधी होत नाहीत. कोणतीही गोष्ट तिला कधीही सांगितली, तरी तिचा आक्षेप नसतो. ती प्रत्येक परिस्थितीसाठी लगेच सिद्ध असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आमच्याकडे सातत्याने लक्ष आहे. ते सर्वांना मोक्षाला घेऊन जाणारच आहेत.’’

क्षणचित्रे

१. या सोहळ्याच्या वेळी पू. सुनीताभाभी यांच्या गळ्यात घातलेल्या हारातील गुलाबाच्या काही पाकळ्या खाली पडल्या. त्या पाकळ्या बरोबर पू. प्रदीपभैय्या आणि पू. सुनीताभाभी यांच्या चरणांसमोरच पडल्या. यावर सद्गुरु डॉ. पिंगळे काका म्हणाले, ‘‘संत भक्तराज महाराज यांना गुलाब प्रिय होते. या पाकळ्यांच्या माध्यमातून त्यांचेही आशीर्वाद लाभले आहेत.’’

२. पू. सुनीता खेमका या संतपदी विराजमान झाल्यानंतर एकाच परिवारातील ३ जण संत झाल्याची सनातनच्या इतिहासात नोंद झाली. पू. सुनीता खेमका यांचे पती पू. प्रदीपदादा आणि त्यांच्या सासू पू. गीतादेवी खेमका यांनीही संतपद प्राप्त केले आहे.

गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला पू. प्रदीप खेमका यांच्यासारखे पती मिळाले
आणि त्यांनीच मला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त केले ! – पू. (सौ.) सुनीता खेमका

सन्मानानंतर मनोगत व्यक्त करतांना पू. (सौ.) सुनीता खेमका म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरूंच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका जयपूरला आल्यावर साधनेच्या प्रयत्नांविषयी मी त्यांना विचारले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘योग्य वेळ आल्यावर सर्व होईल.’’ आज त्याचा अर्थ कळला. मला प्रारंभीपासूनच परिवारातील सर्वांचा स्नेह मिळाला. क्रोधी स्वभावाचे असूनही सासरे कधी रागावले नाहीत. सासूबाईंनी मला सुनेसारखे नव्हे, तर मुलीसारखे प्रेम दिले. पूर्वी मला घरात एकटे वाटून रडायला यायचे. नामजपामुळे माझा हा स्वभाव कधी पालटला, हे मला ही कळले नाही. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला पू. प्रदीप खेमका यांच्यासारखे पती मिळाले. त्यांनीच मला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त केले आहे. मी नेहमी आज्ञापालनाचा दृष्टीकोन ठेवला. जे जे पू. प्रदीप यांनी सांगितले, तेच केले. मी एका क्षणासाठीही नकारात्मक झाले, तरी पू. प्रदीप मला एका क्षणात सकारात्मक करतात.

मुलीच्या आजारपणात चिकित्सालयात असतांना मला ‘मी रामनाथी आश्रमात आहे’, असेच जाणवत होते. तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका (नर्स) साधकांसारख्याच जाणवत होत्या. नुकतीच विमानप्रवासात पू. प्रदीप यांची प्रकृती पुष्कळ खराब झाली. त्या वेळी मला काहीही वाटले नाही. त्या वेळी गुरुदेवांनीच सांभाळले होते. ‘ते आहेतच’, हीच श्रद्धा दृढ असल्याने विमानातील आधुनिक  वैद्यांना बोलवण्याचेही मला सुचले नाही किंवा त्याची आवश्यकता वाटली नाही. त्या दिवशी विमानातून प्रवास करतांना पर्स स्वतःजवळच ठेवली होती. तिच्यात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेली अग्निहोत्राची विभूती होती. देवाने सुचवल्याप्रमाणे पू. प्रदीप यांना विभूती लावून मी जप करत बसले. शेवटी हेच सांगावेसे वाटते की, ‘‘कृपा न होती गुरुवर तुम्हारी । जाने न गती क्या होती हमारी ॥’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात