भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

कोल्हापूर येथे ‘बी न्यूज’च्या ‘भक्ती’ वाहिनीवर २ मास सनातन संस्थेच्या विशेष सत्संगांचे प्रक्षेपण

आपत्काळात साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विशेष सत्संगांचे आयोजन करण्यात आले आहे.

योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहीत केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ ‘संयोग होणे’ असा आहे. ‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे’ असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात झाला आहे….

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी देवाचे भक्त व्हा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन संस्था

आतापर्यंत आपण आपला वेळ शिक्षण, नोकरी आणि आयुष्य या अशाश्वत गोष्टींच्या मागे घालवला. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्यास सर्वकाही पूर्ववत् होईल, असेही आपल्याला वाटत असेल; मात्र तसे नाही.

सनातन संस्थेच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा साधनाप्रवास

मी सर्व नामजप सोडले आणि कुलदेवतेचा नामजप चालू केला. घरातील स्वयंपाक करणा-या मावशींना, तसेच येणा-या-जाणा-या लोकांना मी नामजप सांगायला आरंभ केला.

सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास !

‘नियोजनकौशल्य आणि नेतृत्व गुण असलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी मुंबई अन् कर्नाटक येथील प्रसारकार्य वाढवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले.

प.पू. दास महाराज यांनी बालपणापासून केलेली मारुतीची भक्ती आणि त्यांना ध्यानावस्थेतील मारुतिरायाचे झालेले सगुण दर्शन !

‘२३.४.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधक श्री. दिवाकर आगावणे यांना त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी श्री. दिवाकर यांना त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांना झालेले मारुतिरायाचे दर्शन यांविषयी अवगत केले.   १. लहानपणी नारळाच्या झाडावर चढल्यावर ३० – ३५ फुटांवरून खाली पडूनही काही इजा न होणे … Read more

सातारा येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिकेला आरंभ !

सातारा जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले.

संपूर्ण विश्‍वासाठी ‘हिंदु धर्म’ हाच आशेचा किरण ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

सनातन धर्माचे आचरण न झाल्याने माणसांमधील श्रद्धाभाव न्यून होऊन विकृती वाढली. वास्तविक आपत्तींमागील खरे कारण सनातन धर्माचे आचरण न करण्यामध्ये आहे.