
पुणे – निसर्गाच्या र्हासामुळे वाढलेले प्रदूषण कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे काहीसे न्यून झाले असले, तरी हा पालट परिस्थितीजन्य आणि तात्कालिक आहे. सनातन हिंदु धर्म निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये देवत्व पहाण्याची शिकवण देतो; मात्र भारतावर आलेल्या परकीय आक्रमकांनी येथील संस्कृतीचाही र्हास केला. निसर्गाचे शोषण केले. स्वातंत्र्योत्तर काळातही जनतेची सनातन हिंदु धर्माशी नाळ जोडण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. सनातन धर्माचे आचरण न झाल्याने माणसांमधील श्रद्धाभाव न्यून होऊन विकृती वाढली. वास्तविक आपत्तींमागील खरे कारण सनातन धर्माचे आचरण न करण्यामध्ये आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना, संपूर्ण जग हिंदु संस्कृतीकडे आश्वासकपणे आकर्षित झाले आहे. साथीचे रोग आणि प्रदूषण यांवरील शाश्वत उपाय सनातन धर्माचे पालन करण्यातच सामावलेला आहे, हे होते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महामारी आणि प्रदूषण यांवर उपाय : सनातन परंपरा’ या विषयावरील विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे सार ! ११ जून या दिवशी ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ या माध्यमांतून या विशेष संवादाचे प्रक्षेपण करण्यात आले. या परिसंवादामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेले न्यायमित्र अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता, ‘ग्रीन इंडिया ट्रस्ट’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते. या ‘ऑनलाईन’ विशेष चर्चेच्या माध्यमातून प्रदूषण, साथीचे रोग तसेच नैसर्गिक आपत्ती निर्माण होण्यामागील कारणांचा वेध घेण्यात आला. यांवरील उपायांचा सनातन हिंदु धर्माच्या आचरणाशी असलेला संबंधही उलगडून दाखवण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे देहलीचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
संपूर्ण विश्वासाठी ‘हिंदु धर्म’ हाच आशेचा किरण ! – चेतन राजहंस
कोरोनाच्या निमित्ताने आज जगभरातील लोक हस्तांदोलनाऐवजी हात जोडून नमस्कार करणे, शाकाहार घेणे, प्राणायाम करणे, तसेच मृत व्यक्तीचे दफन न करता त्यांच्यावर अग्नीसंस्कार करणे अशा हिंदु पद्धतींचा अवलंब करत आहेत. रोगराईपासून वाचण्यासाठी आणि वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करण्याची संकल्पनाही भारतीय संस्कृतीमध्ये आहे. संपूर्ण विश्वासाठी आज ‘हिंदु धर्म’ हाच आशेचा किरण आहे.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...