सातारा येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिकेला आरंभ !

सातारा – सातारा जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे प्रभावित झालेल्या सहभागी वाचकांनी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाची मागणी केली. त्यानुसार ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिका चालू झाली असून आतापर्यंत ५ हून अधिक सत्संग पार पडले आहेत.

जिल्ह्यातील ७६ हून अधिक जिज्ञासू आणि त्यांचे कुटुंबीय या सत्संगाचा नियमित लाभ घेत आहेत. या सत्संगामध्ये सकारात्मक विचारांचे महत्त्व, नामजपाचे महत्त्व, नमस्काराची योग्य पद्धत, प्रार्थना आणि कृतज्ञता यांचेे महत्त्व, दैनंदिन जीवनातील ताण न्यून कसा करायचा ? आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सत्संगात सहभागी झालेल्या जिज्ञासूंनी तत्परतेने साधनेला प्रारंभ करत त्यांच्या कुटुंबियांसह नामजपाला बसत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment