साधना करण्याचा आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचा सहभागी तरुणांचा निर्धार !
मुंबई – मागील काही मासांपासून आलेल्या नैसर्गिक आपत्ती, अनाचार, आर्थिक संकटे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव ही स्थिती म्हणजे येणार्या भयावह आपत्काळाची सूचनाच आहे. अशा आपत्काळात सुदृढ शरीर, सक्षम मनोबल आणि साधना, तसेच ईश्वरी अधिष्ठान यांच्या साहाय्याने स्वतःचे कुटुंब, समाज अन् राष्ट्र यांच्या सक्षम आधारासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. याचसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचा ४१२ जणांनी संगणकीय प्रणालीद्वारे लाभ घेतला.
शंखनाद, श्लोकपठण आणि प्रार्थना यांनी व्याख्यानाचा प्रारंभ झाला. समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. त्यानंतर समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर आणि श्री. सुमित सागवेकर यांनी सहभागी तरुणांना मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या शेवटी सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन केले.
आपत्काळात रक्षण होण्यासाठी देवाचे भक्त व्हा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
आतापर्यंत आपण आपला वेळ शिक्षण, नोकरी आणि आयुष्य या अशाश्वत गोष्टींच्या मागे घालवला. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्यास सर्वकाही पूर्ववत् होईल, असेही आपल्याला वाटत असेल; मात्र तसे नाही. आपण आज शहामृगाप्रमाणे वाळूत डोके घालून राहिलो आहोत; पण म्हणून वादळामध्ये शहामृग सुरक्षित रहात नाही. याचप्रमाणे पुढे येणार्या संकटांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी साधना करावी लागेल. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेच आहे, मी माझ्या भक्तांचे रक्षण करीन. त्यासाठी आपल्याला साधना करून देवाचे भक्त झाले पाहिजे. सध्याच्या आपत्काळाचे प्रमाण हे अतिशय अल्प आहे. जेव्हा हे प्रमाण वाढेल, तेव्हा जगणे अशक्य होईल. अशा परिस्थितीत आपल्यासमवेत साधनेचे सामर्थ्य असेल, तरच आपण सुरक्षित राहू शकतो.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !