कोल्हापूर – आपत्काळात साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विशेष सत्संगांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी न्यूज’च्या ‘भक्ती’ वाहिनीवर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता ‘चॅनल’ क्रमांक ५३१ वर प्रक्षेपित करण्यात येत आहेत. गेल्या २ मासांपेक्षा अधिक काळ या सत्संगाचे प्रक्षेपण करून लाखो जिज्ञासूंपर्यंत राष्ट्र, धर्म, अध्यात्म, भावजागृती, भारताचा गौरवशाली इतिहास, बालसंस्कार, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तूशास्त्र यांसह अनेकविध विषयांच्या संदर्भातील माहिती घरबसल्या पहाण्यासाठी उपलब्ध होत आहे.
सत्संगांचे प्रक्षेपण करणार्या ‘बी न्यूज’ आणि ‘भक्ती’ वाहिनी यांचे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि सनातन संस्थेचे त्वचारोग तज्ञ मानसिंग शिंदे यांनी विशेष आभार व्यक्त केले असून अधिकाधिक जिज्ञासूंनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !