
देहू (जिल्हा पुणे), १७ जानेवारी (वार्ता.) – ‘लोणारी समाज संघाच्या वतीने श्री क्षेत्र देहू येथे ‘समाजरत्न’ विष्णुपंत दादरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. जयश्री काळे यांनी उपस्थितांना ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी नामजप कुठला आणि का करावा ?, आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्व, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, दैनंदिन जीवनात धर्माचरणाचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १०० हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला.

हिंदु धर्म, संस्कृती, सण यांच्या सामाजिक माध्यमासाठी सिद्ध केलेल्या सनातन संस्थेच्या विविध पोस्ट ‘लोणारी समाज महिला व्हॉट्सॲप समूहा’त पाठवून सर्वांचे प्रबोधन केल्याविषयी साधिका श्रीमती दीपाली मुटेकर यांचा श्रीफळ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला