
लातूर – आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ‘तणाव’ ही गंभीर समस्या झाली आहे. आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. तणाव दूर करण्यासाठी स्वभावदोषांवर मात करायला हवी. त्यासाठी स्वयंसूचना हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील शारदा सदन अनुसूचित जाती-जमाती विद्यालय, श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या प्रशाला, शारदा सेमी इंग्लिश स्कूल आणि डब्लू.पी.एस्. गुरुकुल आश्रम शाळा येथे शिक्षक अन् कर्मचारी यांच्यासाठी ‘ताण-तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ १०० हून अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांनी घेतला.


या प्रसंगी सनातनचे हिरालाल तिवारी यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला आणि श्री. राजन बुणगे यांनी स्वयंसूचना कशा सिद्ध कराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...