आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता अधिक असते. आस्तिक लोक नास्तिकांपेक्षा सरासरी ४ वर्षे अधिक जगतात, असे अमेरिकेतील ‘सोशल सायकॉलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स’ या नियतकालिकात संशोधन प्रकाशित झाले आहे.

कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते.

आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति् (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या धर्मध्वज स्थापना विधीची छायाचित्रमय क्षणचित्रे !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.

आत्मबळ कसे असावे ?

आत्मबळ कसे असावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना २० वर्षांत कष्ट करून मिळवलेले एका वर्षात गमवावे लागले. अशा कठीण परिस्थितीतही महाराजांचे आत्मबळ दृढ होते.

मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फे-यांतून यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या रूपात यज्ञकार्य करणारे समष्टी रत्न आम्ही गमावले ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्‍वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले; कारण त्यांचा आणि सनातन संस्थेचा अत्यंत घनिष्ट असा संबंध अन् संपर्क होता.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.