आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

‘नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता अधिक असते. आस्तिक लोक नास्तिकांपेक्षा सरासरी ४ वर्षे अधिक जगतात’, असे अमेरिकेतील ‘सोशल सायकॉलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स’ या नियतकालिकात संशोधन प्रकाशित झाले आहे.

१.‘धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते ?’, यांचा संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो’, असे या विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले.

२. या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात ‘डेस म्वॉन्स रजिस्टर’, या वृत्तपत्रात जानेवारी ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या ५०५ व्यक्तींच्या श्रद्धांजलींचा अभ्यास करण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात अमेरिकेतील ४२ शहरांतील वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर ऑगस्ट २०१० ते ऑगस्ट २०११ या कालावधीत प्रकाशित झालेल्या १ सहस्र ९६ श्रद्धांजलींचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर वरील निष्कर्ष काढण्यात आला.’

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment