महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – १

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?, याविषयी माहिती दिली आहे. या वनस्पती लागवड केल्याच्या साधारण ३ मासांपासून त्या औषधांसाठी वापरता येण्यासारख्या आहेत.

आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (Terrace Gardening) भाग-२

सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

‘कोरोना’मुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर नामजपावर विश्वास नसतांनाही भावाने नामजप आणि प्रार्थना करणे अन् पुढे त्याने नामजपात सातत्य राखणे

माझा भाऊ मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्याने यापूर्वी कधीही नामजप केला नव्हता. इतरांनाही तो नामजप करण्यापासून परावृत्त करायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे कुटुंबातील सर्वांना त्याची काळजी वाटायची.

साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !

‘परात्पर गुरुदेवांनी प्रथमपासूनच साधकांना शिकवले आहे, ‘‘संतांच्या देहात अडकू नका; कारण संत हे देहधारी असल्याने त्यांना मृत्यू हा असतोच. संतांचे तत्त्वच महत्त्वाचे आहे.’ तत्त्व हे अविनाशी असल्याने ते आपल्याला चिरकाल मार्गदर्शन करू शकते; परंतु संतांच्या देहाचे तसे नसते. संत जिवित असेपर्यंतच आपल्या वाणीद्वारे साधकांना मार्गदर्शन करत असतात.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !

देवभूमी हिमाचल प्रदेश येथे कुल्लु नावाचे नगर आहे. या नगराच्या चारही दिशांना अनेक दैवी स्थाने आहेत. ‘कुल्लु’ म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ !’ जेथे मनुष्यकुळ संपते आणि देवकुळ चालू होते, म्हणजेच जे देवतांचे निवासस्थान आहे, ते म्हणजे ‘कुलांतपीठ !’ अशा कुलु प्रदेशात ‘मणिकर्ण’ नावाचे स्थान आहे.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

सत्तरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक हानी : अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला

अतीवृष्टीमुळे राज्यातील म्हादई, वाळवंटी, रगाडा, शापोरा आदी नद्यांचे पाणी सत्तरी आणि डिचोली तालुक्यांमधील शेती-बागायतींमध्ये शिरले आहे. सर्वाधिक हानी सत्तरी तालुक्यात झाली आहे. पैकुळ, सत्तरी आणि शेळ-मेळावली येथील पूल कोसळले आहेत. अडवई, सत्तरी आणि वाळपई पालिका क्षेत्रातील काही घरे कोसळली आहेत. वाळपई शहरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अन्य गावांशी संपर्क तुटला आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् व्याख्याने यांद्वारे प्रसार !

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ जिज्ञासूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या १ मासापासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथे ‘ऑनलाईन’ ८९ प्रवचने घेण्यात आली. यांतून १ सहस्र ४८६ जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

आपल्याला समजलेली साधना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला समजलेली साधना आणि मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त समष्टी साधनेत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया, असे चैतन्यमय मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले.