‘कोरोना’मुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर नामजपावर विश्वास नसतांनाही भावाने नामजप आणि प्रार्थना करणे अन् पुढे त्याने नामजपात सातत्य राखणे

सौ. संदीप कौर

 

१. भावाने त्याला कोरोना झाल्याचे सांगून श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे
सांगितल्यावरही भीती न वाटणे आणि दोघांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे

देहली येथील माझ्या भावाने (वय ५० वर्षे) सांगितले, ‘‘माझा (भावाचा) कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला आहे आणि मी आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार उपचारांना आरंभ केला आहे.’’ त्याच रात्री २ वाजता त्याने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मला श्वास घेण्यास कठीण होत असल्यामुळे मी खोलीच्या बाहेर आलो आहे. मोकळ्या हवेत मला श्वास घ्यायला सोपे होईल’, असे वाटले; परंतु त्याचा काही लाभ झाला नाही.’’ त्याच्या गंभीर स्थितीविषयी ऐकल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला भीती वाटली नाही. मी त्याला परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करायला सांगितली. मी पुढील प्रार्थना म्हणत होते आणि माझा भाऊ माझ्या मागोमाग ही प्रार्थना म्हणत होता, ‘हे गजेंद्रमोक्ष, माझे रक्षण करा, हे गजेंद्रमोक्ष मला क्षमा करा, हे गजेंद्रमोक्ष, मला तुमच्या चरणी शरण घ्या.’

 

२. भावासह प्रार्थना आणि नामजप
केल्यावर त्याला बरे वाटून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे

आम्ही बराच वेळ भ्रमणभाषवर अशा प्रकारे प्रार्थना करत होतो. नंतर त्याने सांगितले, ‘‘आता मला बरे वाटत आहे.’’ तरीही आम्ही प्रार्थना करणे चालू ठेवले आणि त्यानंतर आम्ही कोरोनाच्या कालावधीत आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी करायचा नामजप करू लागलो. त्याला अशा प्रकारे रात्रीचे एकटे सोडणे मला योग्य वाटत नव्हते. आम्ही जवळजवळ दोन-अडीच घंटे नामजप करत होतो. नंतर त्याने सांगितले, ‘‘माझ्या प्रकृतीत आता पुष्कळ सुधारणा आहे आणि आता मला झोप येत आहे. त्यामुळे मी झोपतो.’’ पहाटे ५ – ५.३० च्या सुमारास तो झोपला. त्यानंतर दिवसेंदिवस त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली.

 

३. मार्क्सवादी विचारसरणीमुळे भावाने
इतरांना नामजप करण्यापासून परावृत्त केलेले असणे आणि ‘कोरोना’
काळात आलेल्या अनुभूतीमुळे त्याने नियमित नामजप अन् पूजापाठ यांना आरंभ करणे

माझा भाऊ मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्याने यापूर्वी कधीही नामजप केला नव्हता. इतरांनाही तो नामजप करण्यापासून परावृत्त करायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे कुटुंबातील सर्वांना त्याची काळजी वाटायची. आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझा भाऊ प्रतिदिन काही वेळ नामजप आणि पूजापाठ करत आहे. त्याने सांगितले, ‘‘हा प्रसंग मला शिकवण्यासाठीच माझ्या जीवनात घडला.’

परात्पर गुरुदेवांनी आमचे रक्षण केले. त्यासाठी मी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता अर्पण करते. हे गुरुदेवा, आपणच आम्हाला प्रत्येक प्रसंगात सांभाळत आला आहात. आता हा विश्वास दृढ झाला आहे की, यापुढेही आपणच आम्हाला सदैव सांभाळणार आहात.’

– सौ. संदीप कौर, फरिदाबाद, हरियाणा.
या लेखात करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment