समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !
उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.