फोंडा (गोवा) – उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता घोषित केल्यानंतर उपस्थित सर्व सद्गुरु, संत आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक भावविभोर झाले. गुरुकृपायोगानुसार साधना करून पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद्गुरुपद प्राप्त केले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या पत्नी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी त्यांचे पुत्र श्री. सोहम् सिंगबाळ हेही उपस्थित होते.
Home > सनातन वृत्तविशेष > समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !
समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

