संगीत

पाश्चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे. – एक प्रसिद्ध संगीतकार

 

संगीत आणि नृत्य यांत सत्त्व-रज गुण येण्याचे कारण

‘संगीतासह नृत्य आले की, ‘रजोगुणी आनंद’ आला. संगीत सत्त्वगुणी आहे. शरिराची हालचाल झाली की, रजोगुण वाढतो; पण नृत्य करणारी व्यक्ती ७० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढची असेल, तर असे होत नाही.

– (श्रीचित्‌शक्‍ति) सौ. अंजली गाडगीळ, मदुराई, तमिळनाडू. (१७.२.२०१५)

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली. त्याचीच परिणती म्हणजे त्याने केलेली सृष्टीची उत्पत्ती. या सृष्टीतील प्रत्येकच जीव त्या वेळी सोऽहम् म्हणजे तोच मी आहे, या भावात होता, म्हणजेच प्रत्येक जिवाला आपण भगवंताचाच अंश आहोत, याची पूर्ण जाणीव होती. सृष्टीच्या रचनेच्या वेळीच भगवंताने त्याच्याशी एकरूपता साधण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तीयोग इत्यादी विविध योगमार्गांची निर्मिती केली. यासमवेतच विविध दैवी कलांची उत्पत्ती करून त्यायोगेही जिवाने साधना करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, हा त्यामागील उद्देश होता. संगीत ही त्यातीलच एक कला. गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा समावेश ज्यात होतो, त्याला संगीत असे म्हणतात.

गीत (गायन) संदर्भात मार्गदर्शन

गायन सेवा करतांना आलेल्या अनुभूती

गायनासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण संशोधन

शास्त्रीय संगीतातील राग विकारांवरही परिणामकारक

‘भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती. तरीही त्या रागाने त्या दोन विकारांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे परिणाम केल्याचे दिसून आले. याची माहिती येथे दिली आहे.

गायकाचा ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने होणारा प्रवास