गायन सेवा सादर करणार्‍या दोन साधिकांपैकी एकीचे डोळे बंद असणे आणि दुसर्‍या साधिकेचे डोळे उघडे असणे यांमागील शास्त्र !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली. तेव्हा कु. तेजल पात्रीकर यांचे डोळे बंद होते आणि सौ. अनघा जोशी यांचे डोळे उघडे होते. त्यामागील आध्यात्मिक कारण पुढील प्रमाणे आहे.

डावीकडून सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर

 

१. डोळे मिटून गायनसेवा सादर करतांना कु. तेजल पात्रीकर यांना जाणवलेली सूत्रे

अ. गीत गायनापूर्वी ‘सूर व्यवस्थित लागेल ना ? सगळे नीट होईल ना ?’, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात होते. त्यामुळे आरंभी मला सहजता साधणे काहीसे कठीण झाले होते.

आ. गायनाला आरंभ झाल्यावर माझ्या मनात काळजीचेे विचार येणे बंद झाले.

इ. माझे डोळे आपोआप मिटले गेले. ‘परात्पर गुरुदेवांच्या चरणी गायन अर्पण होऊ दे’, असे मला वाटत होते.

ई. स्वर सहजतेने आतपर्यंत पोचत होते.

उ. माझी वृत्ती अंतर्मुख होऊन माझे मन निर्विचार झाले. त्या सुरांतून मला ध्यान अनुभवायला आले.

ऊ. गायन पूर्ण होईपर्यंत माझे डोळे मिटलेले होते. मला डोळे उघडता आले नाहीत.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

२. डोळे उघडे ठेवून गायनसेवा सादर करतांना सौ. अनघा जोशी यांना जाणवलेली सूत्रे

अ. ‘गायनसेवा चालू करण्याआधी मी आनंदी होते.

आ. प्रारंभी साधारण २ मिनिटे सूर जुळण्याविषयी माझ्या मनात विचार होते.

इ. त्यानंतर हे विचार नाहीसे होऊन पुन्हा मनाची अवस्था आनंदी झाली होती. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.

ई. माझे डोळे उघडे असूनही माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते. माझे अनुसंधानाकडे लक्ष होते.’ (‘यालाच ‘जागृतावस्थेतील ध्यानावस्था’, म्हणतात. – संकलक)

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, गोवा

 

गायन सेवा सादर करतांना डावीकडून सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर

 

३. कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी या दोघी
गायन सेवा सादर करत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सामाईक सूत्रे

अ. दोघीही भावावस्थेत गायन करत होत्या.

आ. दोघींच्याही कंठामध्ये साक्षात माता सरस्वतीचे सूक्ष्म रूप विराजमान होते. त्यामुळे दोघींच्या माध्यमातून साक्षात सरस्वतीदेवीनेच गायनसेवा केली.

इ. दोघींचे स्वर एकमेकींच्या स्वरांशी एकरूप झाल्यामुळे ऐकतांना दोन आवाज ऐकू न येता एकच आवाज ऐकू येत होता. जेव्हा दोन गायकांची मने जुळतात, तेव्हाच त्यांचे स्वर एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात.

ई. जेव्हा गायक गीताचा भावार्थ आणि स्वरांतील नाद यांच्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याचे डोळे आपोआप बंद होतात किंवा उघडे रहातात अन् त्याच्या हातांची हालचाल नकळत होते.

 

४. गातांना डोळे उघडे असणे आणि बंद असणे यांतील भेद

 

५. साधक गायकांच्या गायनाचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम !

साधना न करणार्‍या गायकांच्या गायनाचा परिणाम श्रोत्यांवर अल्प काळ टिकतो आणि तो वरवरचा असतो, तर साधना करणार्‍या गायकांच्या गायनाचा परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि तो आध्यात्मिक स्तरावरील असतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment