रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’च्या उद्घाटन कार्यक्रमात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सहभागी !

अबू धाबी – येथील वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाले. मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण पाठवले होते.

खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !

रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी यासाठी खेड येथे ५ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार

प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.

आळंदी (पुणे) येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सव निमि‌त्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले आशीर्वाद !

पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी दर्शन घेतले.

सनातन संस्थेद्वारा हरमल, गोवा येथे आयोजित ‘जाहीर साधना प्रवचन’ संपन्न !

सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म  या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.

गडकोट मोहिमेसाठी जाणाऱ्या सांगली येथील धारकऱ्यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे, श्री. अनिल तानवडे, श्री. राजू पुजारी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.