विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख अन् प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत रायपत यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्याचे प्रांत सहमंत्री श्री. मनोज पोतदार आणि श्री. रंगनाथ मेहतो हेही श्री. रायपत यांच्या समवेत होते. या सर्वांना सनातन संस्थेचे साधक श्री. गुरुराज प्रभु यांनी आश्रमाची माहिती सांगितली. आश्रमाचे पवित्र वातावरण आणि सात्त्विकता अनुभवल्यावर या सर्वांना पुष्कळ आनंद झाला अन् ‘आश्रमात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे’, असे त्यांनी सांगितले. यासमवेत ‘काटकसर, व्यवस्थितपणा, नियोजन कुशलता आदी विविध गोष्टी शिकण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांनाही पुढील वेळी आम्ही घेऊन येऊ’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या वेळी श्री. मनोज पोतदार यांनी अध्यात्माविषयी जाणून घेण्यासंदर्भात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या प्रशिक्षण सत्रात साधकांना आमंत्रित केले.

Leave a Comment