देहली येथे दत्त जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्त्यांविषयी लिहिलेल्या तेजस्वी विचारावर एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेली टीका आणि त्याचे हिंदुत्वनिष्ठांनी केलेले समर्पक खंडण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ही चौकट वाचून एका शहरातील एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या एका गटात पोस्ट टाकून या चौकटीतील लिखाणाविषयी टीका केली आहे. या टीकेचे त्याच गटातील हिंदुत्वनिष्ठांनी समर्पक उत्तरे देऊन खंडणही केले आहे.

सतीसावित्रीचा उपहास आणि मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते.

औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात.

आध्यात्मिक सोपी कोडी – भाग १

आपण ज्या वेळी जीवनात येणार्‍या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते.

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.

दत्त जयंती निमित्त ठाणे जिल्ह्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर यांच्या भेटी

ठाणे येथे दत्त जयंती निमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ को-या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो.

दत्त जयंती निमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

दत्त जयंती निमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली.