चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना देण्यात आले.

मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !

मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न असते, तेव्हा मेंदूची वाढ सर्वांत जास्त होते; म्हणून आईच्या दुधातील घटक असे असतात की, त्यामुळे ते दूध मेंदूची वाढ करण्यासाठी उत्कृष्ट अन्न ठरते.

महान संत विसोबा खेचर यांनी शिष्य नामदेवांना शिकवणे

पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. एका ज्योर्तिलिंग मंदिरात त्यांचे सद्गुरु विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था पुढीलप्रमाणे होती : एका वृद्ध पुरुषाप्रमाणे त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वहात होता.

भावनाशीलता या दोषावर मात करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन

एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो.

विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे ३० जुलै या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री करू नये, यासाठी भव्य जनजागृती फेरी काढली. यात मोठ्या संख्येने महिला आणि युवा वर्ग सहभागी झाला होता.

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध हिंदुप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती

१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद १ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम … Read more

सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी : यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्‍या भारतियांना नाथुला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध घातला, तसेच सिक्किमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर उद्ध्वस्त केली. असे असूनही सरकार चीनशी व्यापार वाढवत आहे.

प.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उलगडलेले विश्‍वकल्याण स्वरूप !

‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्‍वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्‍वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते.