जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट (जिल्हा नांदेड) – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. या वेळी सौ. बुणगे यांनी ‘हिंदु धर्म, हिंदु राष्ट्र, धर्मशिक्षण’ यांविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाचा ५०० भक्तांनी लाभ घेतला.

सध्याच्या काळात आवश्यक असलेला विषयच तुम्ही सांगता ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते

विषय मांडल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ कार्यकर्त्यांनी येऊन सांगितले, ‘‘ज्या विषयाची सध्याच्या काळात आवश्यकता आहे, त्याविषयीच तुम्ही सांगत आहात. ते पाहून आम्ही कार्यक्रमाला आलो. तुम्ही परखडपणे सर्व सांगता, ते आवडले. आम्ही रामनवमीचा उत्सव साजरा करतो, तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी या. आम्हाला या विषयाची आवश्यकता आहे.’’ त्यांनी साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी सिद्धता दर्शवली आणि ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ खरेदी केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment