निज आश्विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
निज आश्विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व या लेखात वाचता येर्इल.
निज आश्विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व या लेखात वाचता येर्इल.
महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे. त्यामुळे आपल्यामध्ये देवीचे शक्तीतत्त्व जागृत होऊन आत्मबळ वाढेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले.
हॉलंडमध्ये गायीची गळाभेट घेण्याचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात चालू झाल्यावर त्याचा प्रसार युरोपमधील आणखी काही देशांमध्ये होत आहे. यातून जीवनामध्ये शांतता अनुभवता येत असल्याने त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ञ याला ‘गो उपचार’ (cow therapy) असे म्हणू लागले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.
‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप ‘गूगल प्ले स्टोअर’वर सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. अधिकाधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा आणि सात्त्विक स्तोत्र, आरती, श्लोक, मंत्र, नामजप आदींचा लाभ करून घ्यावा.
‘शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. या वर्षी ‘अधिक आश्विन मास’ असल्याने निज आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.
नवरात्रीमध्ये देवीतत्त्व नेहमीपेक्षा एक सहस्र पटींनी कार्यरत असते. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय. ‘घडा’ या पारंपरिक नृत्याचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
हिंगलाजमाता मंदिर हे ५१ शक्तिपिठांपैकी एक असून ते पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र (डोके) पडले होते. हिंगोल नदीच्या काठावर आणि मकरान वाळवंटाच्या खेरथार टेकड्यांत वसलेले श्री हिंगलाजमाता मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.
५१ शक्तिपिठांपैकी ५ शक्तिपिठे बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत. बकुरेश्वर, नालहाटी, बंदीकेश्वरी, फुलोरादेवी आणि तारापीठ ही ती शक्तिपिठे होत. द्वारका नदीच्या काठावरील महास्मशानामध्ये पांढर्या शिमूल वृक्षाखाली सतीच्या तिसर्या नेत्रातील बाहुलीतील तारा पडला; म्हणून याला ‘तारापीठ’ म्हटले जाते.
श्री वैष्णोदेवी मंदिर हिंदु धर्मियांसाठी एक पवित्र स्थळ आहे. श्री वैष्णोदेवीला ‘माता राणी’ म्हणूनही संबोधले जाते. जम्मू जिल्ह्यातील कटरा येथून १४ किलोमीटर चढण चढल्यानंतर एका डोंगरावर हे मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनाला येतात.