१. ‘गुरुपुष्यामृत योग’ म्हणजे काय ?
‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे, असा प्रघात आहे.
२. वर्ष २०२० मधील ‘गुरुपुष्यामृत योग’

या वर्षी चार ‘गुरुपुष्यामृत योग’ आहेत. त्यांच्या तिथी आणि त्यांचा कालावधी पुढे दिला आहे.
अ. चैत्र शुक्ल पक्ष नवमी (२.४.२०२०) : सायं. ७.२८ (१९.२८) नंतर दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत
आ. वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (३०.४.२०२०) : सूर्योदयापासून दुसर्या दिवशी पहाटे १.५३ (२५.५३) पर्यंत
इ. ज्येष्ठ शुक्ल पक्ष षष्ठी (२८.५.२०२०) : सूर्योदयापासून सकाळी ७.२७ पर्यंत
ई. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा (३१.१२.२०२०) : सायं. ७.४९ (१९.४९) पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत
३. वर्ष २०२० मधील ‘गुरुपुष्यामृत योगां’ची वैशिष्ट्ये !
अ. २.४.२०२० आणि ३१.१२.२०२० या दिवशी असलेले ‘गुरुपुष्यामृत योग’ सूर्यास्तानंतर चालू होऊन सूर्योदयाला संपतात. सूर्यास्तानंतर असल्याने हे योग फारसे लाभदायक नाहीत.
आ. या वर्षी होणार्या सर्व ‘गुरुपुष्यामृत योगां’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (मकर राशीत गुरु ग्रह असणे, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हे ‘गुरुपुष्यामृत योग’ फारसे लाभदायक नाहीत. या काळात शारीरिक त्रास आणि आर्थिक मंदीचे संकट असण्याची शक्यता असेल.
हे सर्व ‘गुरुपुष्यामृत योग’ साधनेसाठी अनुकूल आहेत; कारण गुरु ग्रह मकर राशीत असतांना आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरूंचे आज्ञापालन करून अष्टांग साधनेचे शुभकार्य करण्याचा प्रयत्न करूया.’
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !