कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. ती येथे देत आहोत.

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते.

भारतभरातील मंदिरांत श्रद्धाहीनांना कदापि प्रवेश मिळू नये ! – कृतिका खत्री, सनातन संस्था

मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो अन् त्यांचे दु:ख दूर होऊन त्यांना चैतन्याची, तसेच आनंदाची अनुभूती येते.

आद्यशंकराचार्य यांनी केलेले कार्य

अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, ज्याच्या अंतरात सामान्य जनांच्या उद्धाराचा कळवळा असेल, असा कुणीतरी लोकोत्तर पुरुष त्या कामासाठी अवतरायला हवा होता. ‘हा मार्ग आहे आणि हेच (योग्य) कर्म आहे’, असे आपल्या वाणीने आणि कृतीने उद्घोषित करील, असा तो पुरुषश्रेष्ठ असायला हवा होता. भगवत्पूज्यपाद आद्यशंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले.

‘तौक्ते’ चक्रीवादळाचे सर्वत्र थैमान !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल ! अनेक ठिकाणी झाडे कोसळली समुद्राचे पाणी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिरले ! मुंबई – तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्‍चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी … Read more

साधकांनो, जे घडते, ते भल्यासाठीच, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने कोरोना सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

सध्या कोरोनासारख्या भयावह संकटाने सार्‍या विश्‍वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक राष्ट्रांतील जीवनावश्यक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या विषाणूमुळे मानवाची सर्व स्तरांवर अपरिमित हानी झाली आहे.

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार

८ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत हरिद्वार महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. खरे तर महाकुंभमेळ्याचे प्रथम स्नान महाशिवरात्री अर्थात ११ मार्च या दिवशी होते; परंतु उत्तराखंड शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कुंभमेळा १ ते २८ एप्रिल याच कालावधीत होईल, असे घोषित केले. पुढे प्रत्यक्षात कोरोनाचे प्रमाण वाढल्यानंतर १७ … Read more

सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण !

अक्षय्य तृतीया हे अविनाशी तत्त्वाचे प्रतीक आहे. या शुभदिनी (१४.५.२०२१ या दिवशी) सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.

देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढेल आणि महामारी अन् आर्थिक संकट येणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो. यंदा दळणवळण बंदीमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी वर्तवण्यात आली.