कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

कोल्हापूर – दळणवळण बंदीमुळे विविध घटकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, तसेच विविध प्रकारच्या जिहादच्या माध्यमातून हिंदूंवर आघात होत आहेत. या काळात आसाममध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. या आपत्काळात आपल्याला अनेक हिंदूंपर्यंत साधना पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने किमान २ घंटे धर्मप्रसारासाठी देणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या १४ मे या दिवशी येथील धर्मप्रेमींसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करत होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा जोशी यांनी केले. या मार्गदर्शनाचा लाभ येथील २२५ हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी बंगालच्या निवडणुका झाल्यावर तेथील हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावर होणारे अतिक्रमण आणि सद्यःस्थिती याविषयीची माहिती सांगितली.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

श्री. किरण पाटील, पारगाव – मला मंदिरात नामजप लावण्याची इच्छा आहे. मी मंदिर व्यवस्थापकांना विचारून नामजप लावीन.

कु. पूर्वा करकरे – मंदिरात नामजप लावण्याची संकल्पना चांगली आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

डॉ. महेश पवार – साधनेसाठी आपण आपली तळमळ वाढवली, तर आपल्यात निश्‍चित पालट होतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment