संक्रांतीपूर्वी जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार ! : स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांचे भाकीत

संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे.

सूर्यग्रहणामुळे जगात युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिषाचे भविष्यकथन

‘आज तक’ वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या भविष्यकथनानुसार याचा संपूर्ण जगामध्ये अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे.

कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !

कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील.

देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढेल आणि महामारी अन् आर्थिक संकट येणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो. यंदा दळणवळण बंदीमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी वर्तवण्यात आली.

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्‍विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.

येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांनी वर्ष २०१२ मध्ये देहत्याग केला. ते ठिकठिकाणी प्रवचने करत. यू ट्यूबवरील त्यांच्या अनेक प्रवचनांपैकी एका प्रवचनात त्यांनी आपत्काळ आणि त्यानंतर येणार्‍या सत्ययुगाविषयी माहिती सांगितली आहे. ती येथे लेख स्वरूपात देत आहोत.

नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वर्ष २०२१ मध्येही कोरोना कायम रहाणार ! – मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांची भविष्यवाणी

वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे. निकोलस यांनी वर्ष २०२१ साठी केलेली भविष्यवाणी पाहूया…