पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !

ट्रेड युनियनच्या इतिहासात पहिल्या महिला सरचिटणीसपदी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणाऱ्या सौ. प्रविणा पाटील !

देशातील ट्रेड युनियनच्या इतिहासामध्ये संघटनेच्या सरचिटणीस पदावर महिला पदाधिकारी यांची यापूर्वी निवड झाली नव्हती. सौ. प्रविणा पाटील या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.

हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट आणि अभिप्राय !

या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रम पाहिल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातनच्या साधकांना व्यष्टी साधनेसमवेतच समष्टी साधनाही करायला शिकवतात. ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर साधनेची ही दोन्ही अंगे आत्मसात् करणे आवश्यक आहे; कारण ईश्वर हा सर्व जगाचाच कारभार बघत असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाची प्रचीती देणार्‍या काही बुद्धीअगम्य अनुभूती !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातील तेजतत्त्वरूपी प्रकाशाच्या संदर्भात सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांतून विविध बुद्धीअगम्य अनुभूतींचे नवे दालनच अखिल मानवजातीसाठी खुले झाले आहे. हे प्रयोग, त्याचे छायाचित्रीकरण आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र इत्यादींविषयी या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरादि चार भावंडांत संत मुक्ताबाई आपल्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. चौदाशे वर्षे जिवंत राहून गर्व करणाऱ्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

संत आणि धर्मवीर यांचा सन्‍मान

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या व्‍यासपिठावर नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्‍यक्ष डॉ. भोलानाथ योगी यांनी सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु (सुश्री) स्‍वाती खाडये यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्‍तू देऊन सन्‍मान केला.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठानी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

अत्‍यंत प्रतिकूल स्‍थितीत हिंदुत्‍वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ पी.टी. राजू यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

केरळसारख्‍या राज्‍यात साम्‍यवाद्यांचे प्राबल्‍य असल्‍यामुळे हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यास अत्‍यंत प्रतिकूल वातावरण असूनही अत्‍यंत चिकाटीने आणि सातत्‍याने गेली २० वर्षे हिंदुत्‍वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ पी.टी. राजू यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी प्राप्‍त केली.