रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले !

‘धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून सनातनच्या आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले. त्यासाठी मी या महान संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ‘या महान आश्रमाचा उत्तरोत्तर विकास व्हावा आणि भारताची आध्यात्मिक स्तरावरील विश्वगुरूच्या रूपात पुन्हा प्रतिष्ठापना व्हावी’, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना !’

– अधिवक्ता मदनमोहन यादव, वाराणसी, उत्तरप्रदेश. (१५.६.२०२२)

२. ‘आश्रमात राहून विदेशातील व्यक्तीसुद्धा धर्माविषयी अध्ययन करत आहेत’, हे पाहून पुष्कळ प्रभावित झालो !

‘सनातन संस्था ही हिंदूंची सर्वाेत्कृष्ट आणि एकमेव संघटना आहे. ही संस्था हिंदूंना आध्यात्मिक उन्नती आणि धर्मरक्षण यासाठी प्रेरणा देते. आश्रम पाहून मी पुष्कळ प्रभावित झालो. येथे राहून विदेशातील व्यक्तीसुद्धा धर्माविषयी अध्ययन करत आहेत.’

– श्री. योगेश अग्रवाल (संस्थापक, हिंदु धर्म सेना), जबलपूर, मध्यप्रदेश. (१६.६.२०२२)

३. आश्रमात परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली !

‘मी पहिल्यांदाच आश्रमात आलो आहे. इथे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली आहे. मी येथे परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली. मला येथे चैतन्य जाणवले.’

– श्री. कृष्णात आनंदा पोवार (माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२) 

४. ‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम पाहून समजले !

‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम बघून मला समजले. येथे मला पुष्कळ ऊर्जा मिळाली.’

– श्री. राजू बापूसो यादव, (करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)

५. ‘आश्रम पहाण्यापूर्वी मला निरुत्साह वाटत होता; पण आश्रम पहातांना प्रसन्नता जाणवली.’

– श्री. शरद आनंदराव माळी, कोल्हापूर (१६.६.२०२२)

६. ‘आश्रम पाहून ‘सनातन संस्थेचे कार्य अतिशय अद्भुत आणि देशाला दिशा देणारे, तसेच मन अन् बुद्धी यांना सात्त्विक करणारे आहे’, असे मला वाटले. ‘आश्रम पाहिल्यावर आम्हाला जे शिकायला आणि अभ्यासायला मिळाले, ते कृतीत आणता येण्यासाठी आशीर्वाद मिळावेत’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– श्री. लखन दिलीप जाधव (प्रधान आचार्य, सव्यसाची गुरुकुलं), जिल्हा कोल्हापूर (१७.६.२०२२)

७. ‘आश्रम पाहिल्यावर मला सकारात्मकता जाणवली. आश्रमातील सर्व साधकांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते.’

– श्री. भारत व. बेतकेकर, म्हापसा, गोवा. (१७.६.२०२२)

८. ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.’

– श्री. पंढरीनाथ कृष्णा पित्रे (निवृत्त सार्जंट, भारतीय वायूदल), सांखळी, गोवा. (१७.६.२०२२)

९. ‘साधक, त्यांची साधना आणि कार्य यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच ! हे सर्व मानवाच्या कल्याणासाठीच चालले आहे; पण याची कल्पना मानवास नाही. त्याला जेव्हा ती कल्पना येईल आणि तो त्या दृष्टीने कार्य करू लागेल, तो खरा सोनेरी दिवस !’

– श्री. सचिन गणेश कुलकर्णी, कोल्हापूर, महाराष्ट्र. (१७.६.२०२२)

१०. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे वाटले !

‘आश्रम पाहून आश्रमात पुष्कळ शक्ती असल्याचे जाणवते. जे या आश्रमात निवास करतात, त्या सर्वांना गुरूंची शक्ती भरपूर प्रमाणात मिळत आहे. मला सर्व साधकांमध्ये ती शक्ती असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत आहे. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे मला वाटले. जशी घरातील एखादी मोठी व्यक्ती लहानांवर चांगले संस्कार करते, तसे येथे आहे. येथे कुणीही शिकवण्याच्या भूमिकेत नसतो. मंदिर, मशीद किंवा चर्च कुठेही जा. ‘येथे देणगी द्यावी’, असा फलक लावलेला दिसतोच; परंतु या आश्रमात एकाही ठिकाणी असे दिसले नाही. ‘जे जे कोणी आश्रमात राहून सेवा करतात, त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी’, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. रवींदर रेड्डी (अध्यक्ष, हिंदु देवालय परिरक्षण समिती, तेलंगाणा.) (१७.६.२०२२)

११. आश्रम पहातांना ‘जणू सर्व देवता आमच्या भारतभूमीला सनातनमय करण्यासाठी येथे उपस्थित आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटले !

‘आश्रम म्हणजे जणूकाही चैतन्याचा स्रोतच आहे’, असे वाटले. येथे भेट दिल्यानंतर मी ऊर्जावान होऊन मला कार्य करण्यासाठी शक्ती प्राप्त झाल्याची जाणीव झाली. आश्रमाच्या प्रत्येक ठिकाणी दैवी शक्ती अनुभवता येते. असे वाटते की, ‘जणू सर्व देवता आमच्या भारतभूमीला सनातनमय करण्यासाठी येथे उपस्थित आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत.’ मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. घनश्याम शि. व्यास (राज्यप्रमुख, लष्कर-ए-हिन्द, तेलंगाणा), निजामाबाद ५०३००१ (१७.६.२०२२)

Leave a Comment