सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया’वरील ‘पोस्ट’ त्यांच्या वैयक्तिक समजाव्यात !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतकांना विनंती !

देशविदेशांतील चालू घडामोडींविषयी समाजातील नागरिकांप्रमाणे सनातनचे साधक आणि हितचिंतक सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) स्वत:ची मते ‘पोस्ट’ करत असतात. यामध्ये अनेकदा इतरांकडून येणारे संदेश आणि छायाचित्रे-चलचित्रे (फोटो-व्हिडिओ) फॉरवर्ड/लाइक/पोस्ट केली जातात. यामध्ये काही वेळा राजकीय संदेशदेखील असतात. सनातन संस्था ही बिगरराजकीय स्वयंसेवी आध्यात्मिक संस्था असून अध्यात्माचा प्रसार करते. ‘जिज्ञासू आणि साधक यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी,’ यासाठी संस्था कार्यरत आहे. सनातन संस्था कोणत्याही राजकीय पक्षांसाठी कार्य करत नाही. सनातन संस्था कधीही राजकीय भूमिका मांडत नाही. संस्थेची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार केवळ सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांना आहे. त्यामुळे सनातनचे साधक किंवा हितचिंतक त्यांच्या ‘सोशल मिडिया’ खात्यांद्वारे जर एखाद्या घटनेविषयी, व्यक्ती किंवा सार्वजनिक घडामोडींविषयी टिप्पणी करत असतील, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका समजावी. तिचा सनातन संस्थेशी काही संबंध नाही, याची नोंद घ्यावी.

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था

Leave a Comment