केरळमधील कम्युनिस्टांचा अजब साम्यवाद !

केरळमध्ये सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे सरकार आहे. वर्ष १९५६ मध्ये भारतीय संघराज्यातील केरळ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि १९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथील शाळेत ‘नैतिक शिक्षण’ विषयावर मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी ‘जीवनाचा उद्देश, जीवन कसे जगावे ? जीवनात घडणा-या विविध प्रसंगांना सामोरे कसे जावे ? शिक्षणाचा उद्देश काय आहे ? विद्यार्जन म्हणजे काय ?’, इत्यादींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी केली !

नागदेववाडी येथील ग्रामस्थ दीप अमावास्येला ‘गटारी अमावास्या’, असे म्हणत असत. हा अपप्रचार आहे हे लक्षात घेऊन येथील ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी गावात या सणाविषयीचे धर्मशास्त्र सांगून याविषयी जागृती केली.

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही. मी आतापर्यंत जेवढे विश्वभ्रमण केले, त्यामध्ये या शहराला माझ्या मनात विशेष स्थान आहे, असे वक्तव्य जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते आणि चित्रपट निर्माते ब्रॅड पिट यांनी केले.

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले. भारतीय शिक्षण पद्धतीनुसार येथे साधकांना घडवले जात आहे. हिंदु संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे समजावले जाते, हे पाहून चांगले वाटले’, असे श्री. बाबरिया म्हणाले.

वेलची खाण्याचे लाभ आणि ती कुणी खाऊ नये ?

वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी झाले आहेत. हे त्यांच्या देहात स्थुलातून झालेले दैवी पालट आहेत. अशा प्रकारे देहामध्ये दैवी पालट होण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

बालपणापासूनच धार्मिकतेचे संस्कार झालेल्या लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

आज आपण लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांचा साधनाप्रवास पाहू..

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! भाग २

मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणार्‍या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा साधनाप्रवास येथे पहाणार आहोत. या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://www.sanatan.org/mr/a/87688.html   १०. सूक्ष्मातील कळत असण्याच्या संदर्भातील प्रसंग १० अ. बहिणीच्या मृत मुलाने दूरभाषवरून बोलणे आणि तो दारात उभा असल्याचे दिसणे … Read more

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १

देवरुख येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन होते. या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांना टिळा लावण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी मला त्यांचे जवळून दर्शन झाले. त्या वेळची माझी स्थिती मला आठवत नाही; परंतु माझ्या मनाला आनंद मिळाला.